यशसिद्धी प्रकल्प

ShivajiVivekanandaAmbedkarRatan_TataLincolnEinstein

“मुलाच्या व्यक्तिमत्वासाठी केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक होय.”
– डॉ वाय के शिंदे

ह्या अशा काही व्यक्ती आहेत कि ज्यांनी संपूर्ण मानवजातीवर केवळ प्रभावच टाकला असे नव्हे; तर तिला नव्या उंचीवर नेऊन ठेवले!

त्यांनी हे कसे साध्य केले?
त्यांच्याकडे अशी कोणती शक्ती होती?
ती आपल्यासारखीच हाडामासाची माणसे नव्हती काय?
ती आपल्यासारखी माणसे होती; पण ती असामान्य ‘व्यक्तिमत्वे’ होती!
‘माणुस घडविणे’ किंवा ‘व्यक्तिमत्व घडविणे’ हि संकल्पना नवीन नसून भारतीय संस्कृतीसाठी ती प्राचीन आहे. पण आम्ही ती संकल्पना नव्याने मांडत आहोत…

गुणवत्ता म्हणजे केवळ परीक्षेतील ‘मार्क्स’ नव्हेत… तर जीवनाच्या क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रातील उत्तम व विधायक काम करण्याची क्षमता. ज्यामुळे व्यक्तीचे स्वतः बरोबर समाज, देश व पर्यायाने मानव जातीचे आयुष्य समृद्ध सुंदर आणि आनंदी होईल. उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण, सेवा, आरोग्य, संरक्षण इ. मानवी जीवनातील असंख्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाकडे गुणवत्ता असायला हवी. ही गुणवत्ता व्यक्तीला शिक्षणातून मिळायला पाहिजे.
पण आज,
शिक्षण = मार्क्स = नोकरी = जीवन असे सूत्र होऊन बसले आहे.
जे कोणी ‘मार्क्स’ मिळवू शकत नाही म्हणजेच ते नोकरी मिळवू शकत नाही. मग त्यांनी नाईलाजाने इतर क्षेत्राकडे वळावे…. ?
किंवा मग तुम्ही जर उद्योग, व्यापार, कला, क्रीडा इ. क्षेत्रात उच्च स्थानावर असाल तर मग शिक्षणाची काही गरज नाही… ?
आयुष्यात तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडले तरी उपयोगी पडेल असे शिक्षण आपण स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनीही का देऊ शकलो नाही ?
शिक्षणाचे खरे उद्दिष्ट हे ‘व्यक्तिमत्त्व घडविणे’ किंवा सोप्या शब्दात ‘माणूस घडविणे’ हे असायला हवे. केवळ लेखन, वाचन काही विषयांचे ज्ञान इ. म्हणजे शिक्षण नव्हे. शिक्षणाने माणसाला जीवनात यशस्वी व आनंदी होण्यासाठी तयार केले पाहिजे. हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन डॉ वाय के शिंदे यांनी ‘यशसिद्धी’ प्रकल्पाची उभारणी केली. यांतून वेगवेगळ्या घटकांना मार्गदर्शक अश्या प्रकल्पांची निर्मिती झाली.

व्यक्तिमत्त्व संजीवनी
वय १६ वर्षेवरील सर्वांसाठी. २० गुणवैशिष्ट्यांवर आधारित व्यक्तीचा परिपूर्ण विकास.
अधिक माहितीसाठी पहा –
व्यक्तिमत्व संजीवनी

पालक संजीवनी
जन्मपूर्व अवस्थेपासून वय २२ वर्षे पर्यंतच्या मुलांच्या पालकांसाठी. वयोगटानुसार विकासाच्या विविध अंगांचे व टप्प्यांचे मार्गदर्शन
अधिक माहितीसाठी पहा –
इतर प्रकल्प

मन संजीवनी
मनाचा विकास म्हणजेच व्यक्तीचा विकास. मनाचे स्वरूप, अंतरंग, समस्या तसेच उच्च विकासाबद्दल मार्गदर्शन.
अधिक माहितीसाठी पहा –
इतर प्रकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *