इतर प्रकल्प

मन संजीवनी
 

mind


“बुद्धीमत्तेचा उपयोग केला तर क्षमता वाढतात, तर मनःशक्तींचा उपयोग केला तर वृत्तींचा विकास होतो.
आजच्या शिक्षणात केवळ बुद्धिमत्तेच्या उपयोगावर भर दिला आहे. त्यामुळे मनाचा विकास घडविणे हे केवळ महत्त्वाचेच नसुन ते आवश्यक बनले आहे.”
– डॉ वाय के शिंदे

डॉ. शिंदे यांना सर्व स्तरातील अनेकजणांनी समाजासाठी काही लिहिण्याची मागणी केली. पण शिंदे सरांनी व्यक्ती बदलली तरच समाज बदलेल, हे ओळखले. आज समाजातील अनेक सामाजिक, वैयक्तिक, राजकीय इ. सर्व स्तरातील समस्यांचे मूळ मानवी मनाच्या समस्या, दुर्बलता व विकृती यांत आहे. शिक्षण व इतर माध्यमातून जगाचे ज्ञान व माहिती मिळत आहे, पण मनाचा विकास करण्याचे ज्ञान कोठेच मिळत नाही. किंबहुना मनाचा विकास करायचा असतो हेही आपल्या शिक्षणात कोठे सांगितलेले नाही. ही मुलभूत समस्या ओळखून ‘मन संजीवनी’ ची रचना झाली. मनाचे स्वरूप, विकासावस्था, समस्या, मनविकासासाठी आवश्यक साधना इ. या सर्वांचा ग्रंथात समावेश आहे.
आज माणसाने बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रचंड प्रगती केली आहे मात्र तो मनाचा विकास करायचा विसरून गेला आहे. बुद्धिमत्ता ही श्रेष्ठ क्षमता असली तरीही तिला एक मर्यादा असते. पण मनाला काही मर्यादा असत नाही. हे जरी अदभूत असले तरी ते धोकादायकही आहे. कारण जर मन आपल्या ताब्यात नसेल तर ते आपल्यावर हुकुमत गाजवते …..

पालक संजीवनी
 

parents


“मुलांना अधिकाधिक साधनांची रेलचेल करून देणे म्हणजे त्यांचा विकास नसून; त्यांना योग्य वयात योग्य संधि उपलब्ध करून देणे हाच खरा विकासाचा मंत्र होय.”
– डॉ वाय के शिंदे

मुलाच्या जडणघडणी मध्ये पालकांची भूमिका सर्वात महत्वाची असते. आज एकंदरीत शिक्षण व्यवस्था अडचणीत आहे आणि समाज उदासीन आहे. या परिस्थितीत पालकांची जबाबदारी अधिकच वाढते. आजचे पालक मुलासाठी कितीही पैसा खर्च करायला तयार आहेत, पण ते त्याला वेळ देऊ शकत नाहीत.
व्यक्तिमत्व संजीवनी प्रकल्पासाठी काम करतानाच पालकांचे प्रबोधन करण्याची जास्त गरज आहे हे लक्षात आले.

विकासाचे टप्पे:
मुलांच्या विकासामध्ये वयोगटाप्रमाणे पालकांना वेगवेगळी भूमिका घ्यावी लागते. यासाठी पालकांना मार्गदर्शनपर असे वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम पालक संजीवनी प्रकल्पामध्ये येतात. मुलांच्या विकासाची टप्प्याप्रमाणे कार्यक्रमांची रचना केली आहे. ते टप्पे आणि कृती-कार्यक्रम खालीलप्रमाणे:

वयोगट टप्प्याचे महत्व कृती कार्यक्रम
शैशावावस्था :
जन्म ते २ वर्षे
व्यक्तिमत्वाचा पाया पालकांना मार्गदर्शन कार्यक्रम
पूर्व बाल्यावस्था :
३ ते ५ वर्षे
पाया भक्कम आणि शारीरिक व भावनिक सुरक्षितता पालक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यक्रम
बाल्यावस्था :
६ ते ८ वर्षे
कौशल्ये विकास, चरित्र घडण, नैतिक विकास पालक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यक्रम
उत्तर बाल्यावस्था :
९ ते ११ वर्षे
सामाजिक विकास, बौद्धिक विकास, मुल्यांची घडण पालक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यक्रम
पौगंडावस्था :
१२ ते १६ वर्षे
स्व प्रतिमा, संकल्पना आकलन मुले, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यक्रम
किशोरावस्था :
१७ ते १९ वर्षे
व्यक्तिमत्वाचा उत्कर्ष मुले, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन कार्यक्रम
कुमारावास्था :
२० ते २२ वर्षे
करीअर मार्गदर्शन, समुपदेशन मुलामुलींना मार्गदर्शन कार्यक्रम

मुलांच्या समस्यांवर पालकांचे समुपदेशन:
डॉ. वाय. के. शिंदे यांनी मुलांच्या विकासाचे शास्त्र, मानसशास्त्र, शिक्षण, पालक इ. विषयांत सर्वंकष अभ्यास व भरीव कार्य केले आहे. त्यामुळे मुलांच्या समस्यांबाबत सर्वांगीण ज्ञान व व्यापक अनुभव त्यांच्याकडे आहे. समुपदेशनात मुलांपेक्षा पालकांनाच अधिक मार्गदर्शन करतात. कारण कोणतेही पालक आपल्या मुलांचे हितच पाहत असतात. पण, मुलांच्या विकासाबाबत असलेल्या अज्ञानामुळे किंवा चुकीच्या समाजांमुळे ते मुलाचे जास्तीत जास्त नुकसान करतात.

पालक संजीवनी ग्रंथ:
दर. वाय के शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रभर पालकांना मौल्यवान मार्गदर्शन करत असतात. त्यांचे मुलाच्या विकासाबद्दल योग्य व शास्त्रीय मार्गदर्शन ‘पालक संजीवनी’ ग्रंथात मांडले आहे. ह्या ग्रंथाबद्दल जाणून घेण्यासाठी पहा:
ग्रंथ संपदा

शिक्षक संजीवनी
 

teacher


“आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे ज्यामुळे चारित्र्य निर्माण होईल, मनाची शक्ती वाढेल, बुद्धीचा विस्तार होईल आणि व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहील. ”
– स्वामी विवेकानंद

शिक्षण हे परीक्षा केंद्रित म्हणजेच अंतिमतः पैश्या भोवती फिरू लागले. याला समाज, शिक्षणव्यवस्था, शासन इ. कारणीभूत असले तरी मूळ कारण हे शिक्षणाबद्दलचे सर्वच घटकांचे अज्ञान हेच आहे. आज केवळ पालक, समाज किंवा राज्यकर्ते हेच शिक्षणाबद्दल अज्ञानी आहेत असे नसून शिक्षणाचे केंद्र असणारी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ञ इ. हेदेखील दिशाहीन आहेत. कारण हे सुद्धा याच चाकोरीबद्ध, परीक्षाकेंद्रित शिक्षण व्यवस्थेतून आले आहेत.
आयुष्यात किती विद्यार्थी घडविले हीच शिक्षकाची आयुष्याची खरी ताकद आणि संपत्ती होय, असे शिंदे सर मानत. पण आजचा शिक्षक केवळ अज्ञानामुळे पैसा व सत्ता या तुलनेने गौण गोष्टींमागे धावत आहे. शिक्षकाची आणि शिक्षणाची खरी ओळख करून देण्यासाठी ‘शिक्षक संजीवनी’ प्रकल्पाच्या माध्यमातून डॉ वाय के शिंदे सतत महाराष्ट्रभर प्रबोधन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *