ग्रंथ संपदा

डॉ वाय के शिंदे यांच्या प्रदीर्घ संशोधन, प्रबोधन व प्रबोधन यांतून खालील ग्रंथसंपदा निर्माण झाली आहे. गेली १५ वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ही पुस्तके पोहोचली असून हजारो युवक-युवती. पालक, शिक्षक यांनी त्यांची उपयुक्तता व त्यांचा वैयक्तिक अनुभव व्यक्त केला आहे.

मन संजीवनी :
mind
डॉ. शिंदे यांना सर्व स्तरातील अनेकजणांनी समाजासाठी काही लिहिण्याची मागणी केली. पण शिंदे सरांनी व्यक्ती बदलली तरच समाज बदलेल, हे ओळखले. आज समाजातील अनेक सामाजिक, वैयक्तिक, राजकीय इ. सर्व स्तरातील समस्यांचे मूळ मानवी मनाच्या समस्या, दुर्बलता व विकृती यांत आहे. शिक्षण व इतर माध्यमातून जगाचे ज्ञान व माहिती मिळत आहे, पण मनाचा विकास करण्याचे ज्ञान कोठेच मिळत नाही. किंबहुना मनाचा विकास करायचा असतो हेही आपल्या शिक्षणात कोठे सांगितलेले नाही.
ही मुलभूत समस्या ओळखून ‘मन संजीवनी’ ची रचना झाली. मनाचे स्वरूप, विकासावस्था, समस्या, मनविकासासाठी आवश्यक साधना इ. या सर्वांचा ग्रंथात समावेश आहे.

व्यक्तिमत्व संजीवनी ग्रंथ:
personality
या २० गुणवैशिष्ट्यांवर शास्त्रशुद्ध व रचनात्मक मांडणी केलेला हा ग्रंथ आहे. असंख्य व्यक्तींच्या अनुभवांनीच या ग्रंथाचा अलौकिक दर्जा सिद्ध झाला आहे. हजारो तरुणांना यशाची प्रेरणा या ग्रंथाने मिळाली आहे. मुलांची ‘आधुनिक ज्ञानेश्वरी’ म्हणून याची परीक्षणे झाली आहेत.
मूल्य रु. २५०/-

पालक संजीवनी:
parents
मुलांचा कोणत्या वयात काय विकास होतो यांचे योग्य मार्गदर्शन या ग्रंथात आहे. मुलांना घडविण्यासाठी नेमकी विकासाची संधी कशी उपलब्ध करून द्यावी हे यात शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले आहे.
मूल्य रु. १५०/-

शिक्षक संजीवनी:
teacher
शिक्षक व शिक्षणास पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठी डॉ शिंदे यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. नवीन युगात मुलांचे जीवनमूल्याधिष्टीत उद्योजकीय व्यक्तिमत्व घडविण्याची गरज निर्माण झाली आहे. या ग्रंथातून शिक्षकांद्वारे राष्ट्र उभे करण्याचे स्वप्न ते पाहतात.
मूल्य रु. २५०/-

काही अनुभवपर प्रतिक्रिया:
“आयुष्यातील एका कठीण प्रसंगी माझ्या हाती ‘व्यक्तिमत्व संजीवनी’ हे पुस्तक पडले. यातून मला नवी जिद्द मिळाली व मला स्वतःलाच मार्गदर्शन मिळत गेले. या पुस्तकाने केवळ मी घडलो असे नाही तर इतरांच्या व समाजाच्या विकासाची प्रेरणा मला मिळाली.”
– श्री बालाजी मंजुळे, IAS , जिल्हाधिकारी, आंध्र प्रदेश

हे ग्रंथ आपणास registered parcel ने घरपोच मिळू शकतील. आपणास ग्रंथाचे मूल्य + ५० रु. पोस्टेज पाठवावे लागतील. ग्रंथाच्या मागणीसाठी पुढील पत्यावर संपर्क आवश्यक आहे:

एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिटयूट
पोसेवाडी, ता- खानापूर,
जि- सांगली महाराष्ट्र, पिन- ४१५३०७

Mobile : +91 9423809357
Mobile : +91 9158044040

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *